मुंबई (वृत्तसंस्था) बाजार समित्या बरखास्त करणार असल्याचे विधान केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले आहे. हा शेतकऱ्यांच्या गळ्यात फास घालून आवळण्याचा प्रकार आहे. आधीच शेतकरी कर्जमाफी, कमी हमीभाव, पिकांची नासाडी अशा संकटांनी त्रस्त आहे त्यात हे! असे जुलमी सरकार नकोच, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस नेते धनयंज मुंडे यांनी टीका केली आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बाजार समित्या बरखास्त करण्यासंबंधी केलेल्या वक्तव्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस नेते धनयंज मुंडे यांनी टीका केली आहे. हा शेतकऱ्यांच्या गळ्यात फास घालून आवळण्याचा प्रकार असून, असे जुलमी सरकार नकोच अशा शब्दांत धनंजय मुंडे यांनी संताप व्यक्त केला आहे. कृषी मालाला योग्य बाजारभाव मिळण्यासाठी राज्यांनी एपीएमसी बंद करुन ई-नाम(इलेक्ट्रॅानिक नॅशनल ऍग्रीकल्चर मार्केट) या व्यवहार पद्धतीचा वापर करावा असे आवाहन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले आहे. याद्वारे शेतकऱ्यांना चांगला बाजारभाव मिळू शकतो असे त्यांनी म्हटले आहे. दिल्लीमध्ये राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेतर्फे आयोजित कार्यक्रमात बोलताना सीतारामन यांनी हे आवाहन केले आहे.