मुंबई (वृत्तसंस्था) शेतकरी संकटात आहे, राज्यात अनेक समस्या आहेत. अशात काही राजकीय पक्षांनी जनादेशाचा अनादर केल्यामुळे राष्ट्रपती राजवट लागू झाली असल्याचा आरोप भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहेत.
भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना वेळेत सत्तास्थापना करण्यात अपयश आल्याने अखेर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. याचं खापर आता एकमेकांवर फोडण्यास सुरुवात झाली आहे. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलतांना म्हटले की, भाजप राजकीय परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. आज राष्ट्रपती शासन लागू झाले काही राजकीय पक्षांनी जनादेशाचा अनादार केला. शेतकरी संकटात असून राज्यात अनेक समस्या आहेत. जनादेशाच्या अनादरामुळेच राष्ट्रपती राजवट लागू झाली. काँग्रेस-राष्ट्रवादीने अद्याप शिवसेनेला पाठिंबा दिलेला नाही, किंवा त्यांच्या लोकांनी अद्याप शिवसेना नेत्यांची भेटही घेतली नाही, त्यामुळे आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे,असल्याचेही मुनगंटीवार यांनी सांगितले.