मुंबई (वृत्तसंस्था) राज्यात निर्माण झालेला सत्तास्थापनेचा तिढा लवकरच सुटेल आणि शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल, असा विश्वास शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी व्यक्त केला आहे.
शिवसेनेचे नेते राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी गेले होते. परंतु काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शिवेसेनेला पाठिंब्याचे पत्र न दिल्याने शिवसेनेचा सत्ता संपादनाचा दावा करता आला नव्हता. मात्र, आम्ही सत्ता संपादनाचा दावा करण्यासाठी पुन्हा येणार असल्याचे राज्यपालांच्या भेटीनंतर शिवसेनेचे युवानेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले होते. या नंतर राज्यपालांनी तिसरा सर्वात मोठा पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सत्ता स्थापनेसाठी बोलावले आहे. दरम्यान, या परीस्थितही राज्यात निर्माण झालेला सत्तास्थापनेचा तिढा लवकरच सुटेल आणि शिवसेनाच सत्ता स्थापन करेल, असा विश्वास शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे आज रात्री ८ वाजेपर्यंत नेमके काय-काय घडते? हे पाहणे उत्सुकतेचे आहे.