अमळनेर (प्रतिनिधी) महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष व कवी रमेश पवार यांचा नुकताच शहर पत्रकार व तालुका पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र राज्य साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष रमेश पवार यांची महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाच्या वतीने सदस्यपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा नुकताच सत्कार करण्यात आला. त्यांनी आतापर्यंत अनेक कवितांचा लिखाण केले असून मराठी साहित्य परिषदेच्या अमळनेर शाखेमध्ये त्यांचा काम कौतुकास्पद आहे त्यांच्या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.
कवी रमेश पवार यांच्या कार्याची अमळनेर पत्रकार संघाने दखल घेऊन नुकताच पत्रकार कार्यशाळेमध्ये त्यांचा सत्कार केला.
त्यांचा सत्कार प्रसंगी सेवानिवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ ,खानदेश शिक्षण मंडळाचे विश्वस्त वसुंधरा लांडगे, शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपूत यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. सत्कार झाल्यानंतर त्यांनी अमळनेर तालुक्यातील पत्रकारांनी माझ्या निवडीबद्दल जो सत्कार केला तुम्हाला भविष्यात कार्य करण्यास प्रेरणादायी ठरेल. मी मसापच्या वतीने सर्व पत्रकारांचे ऋणी राहू इच्छितो अशा भावना व्यक्त केल्यात. यावेळी तालुक्यातील व शहरातील पत्रकार संजय पाटील ,किरण पाटील,ऊमेश धनराळे, जितेंद्र ठाकूर, संजय सूर्यवंशी ,सुभाष पाटील, पांडुरंग पाटील, गं का. सोनवणे,जगन्नाथ बडगुजर, विजय पाटील, मिलिंद पाटील ,प्रा विजय गाढे ,उमेश काटे ,जयेश काटे ,मुन्नाभाई ,ईश्वर महाजन ,डॉ विलास साळुंखे, डॉ युवराज पाटील, बाबुलाल पाटील, महेंद्र रामोशी,
शरद पाटील,पि .के .पाटील,प्रा.हिरालाल पाटील, गजानन पाटील,सुरेश कांबळे,करंदीकर, मरसाळे, सचिन चव्हाण,भामरे, जितेंद्र पाटील, गुरुनानक भटेजा, महेंद्र पाटील व तालुक्यातील व शहरातील सर्व पत्रकार उपस्थित होते.