मुंबई (वृत्तसंस्था) राज्यातील सत्तेचा तिढा सोडविण्यासाठी तसेच भाजपला रोखण्यासाठी शिवसेनेला काँग्रेस बाहेरून पाठिंबा देणार चर्चा सुरु आहे. परंतु, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी चर्चा केल्यानंतरच यावर अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी प्रमुख शरद पवार यांनी दिली आहे.
राजस्थानमध्ये काँग्रेसने आपल्या आमदारांना ठेवले आहे. आज (रविवार) ठिकाणी बैठकही घेतली. त्यामध्येच शिवसेनेला पाठिंबा देताना सत्तेत सहभागी व्हायचे की सत्तेच्या बाहेर राहून बाहेरूनच पाठिंबा देत भाजपला दूर ठेवावे यावर चर्चा करण्यात आली. परंतू दुसरीकडे पवार म्हणाले की, भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काय करता येईल यावर ही चर्चा केली जाईल. काँग्रेस आणि राष्ट्रवादी आमदारांचे शिवसेनेसोबत जाण्यास एकमत आहे. तसेच भाजप सत्ता स्थापन करण्यास अपयशी ठरल्यास राज्यपालांनी शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण द्यावे असे राष्ट्रवादीचे म्हणणे आहे.