मुंबई (वृत्तसंस्था) भाजपला राज्यपालांनी सत्तास्थापनेचे निमंत्रण दिल्यानंतर शिवसेनेकडून देखील खबरदारी घेतली जात आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे मध्यरात्री रीट्रीट हॉटेलमध्ये मुक्कास असलेल्या शिवसेना आमदारांच्या भेटीसाठी गेले होते. विशेष म्हणजे आदित्य ठाकरे हे याच हॉटेलमध्ये रात्रभर थांबून होते.
आदित्य ठाकरे हे शनिवारी रात्री आमदारांसोबत चर्चा करण्यासाठी मालाडच्या द रिट्रीट हॉटेमध्ये दाखल झाले. तिथे त्यांनी आमदारांसोबत चर्चा केली आणि चर्चेनंतर आदित्य ठाकरे हे रिट्रीट हॉटेलमध्येच मुक्कामाला थांबले. तर ते अजूनही याच हॉटेलमध्ये थांबले आहेत. राज्यात सत्ता स्थापनेसाठी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी भाजपला अखेर निमंत्रण दिले आहे. सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपला राज्यपालांकडून निमंत्रण देण्यात आले आहे. मात्र, भाजपकडून सत्तास्थापनेबद्दल अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही.