जळगाव प्रतिनिधी । घरकुल घोटाळा प्रकरणात शिक्षा झाल्यानंतर माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी औरंगाबादच्या उच्च न्यायालयात निकालास आव्हान देण्यासाठी धडपड सुरू होती. मात्र आता या खटल्याचे कामकाज मुंबई उच्च न्यायालयात होणार आहे.
औरंगाबाद खंडपीठात खटला दाखल झाल्यानंतर काही सुविधा मिळावी व यासाठी माजी मंत्री जैन यांनी औरंगाबाद उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मात्र उच्च न्यायालयाचे न्यायाधिश नलावडे यांनी वारंवार केलेला अर्ज फेटाळून लावला होता. वारंवार अर्ज करूनही कोणत्याही मागणीची दखल घेत नसल्याने सुरेशदादा जैन यांनी खंडपिठ बदलवून मिळावा अशी मागणी सर्वोच्च न्यायालयाकडे केली होती. सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या अर्जाची दखल घेत त्यांचा अर्ज मंजूर करून तो मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्याचे आदेश दिले आहे.