फैजपूर येथे सरदार पटेल जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिर

blood camp

फैजपूर, ता.यावल प्रतिनिधी | अखंड भारताचे शिल्पकार तथा माजी केंद्रीय गृहमंत्री भारतरत्न अॅड.सरदार वल्लभभाई झवेरभाई पटेल यांच्या १४४ व्या जयंतीनिमित्त ऐतिहासिक फैजपूर शहरात जयंती उत्सव समिती लेवा प्रतिष्ठानच्या विद्यमाने आज (दि.३०) बुधवार रोजी सकाळी ९.०० वाजता गावातील श्रीराम मंदिर येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. महानंदा ताई होले यांच्या हस्ते करण्यात आले. एकूण ५६ रक्तदात्यांनी यावेळी रक्तदान केले.

 

याप्रसंगी याप्रसंगी जिल्हा दुध संचालक तथा नगरसेवक हेमराज चौधरी, माजी उपनगराध्यक्ष केतन किरंगे समाजसेवक रवींद्र होले, डॉ. उमेश चौधरी, डॉ. सुशांत पाटील, दीपक होले, मनोज पाटील, जितेंद्र भारंबे , अनिरुद्ध सरोदे, संजय सराफ, संजय रल, भूषण चौधरी, संजय नारखेडे, तुकाराम बोरोले, यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सरदार पटेल जयंतीउत्सव समितीचे अध्यक्ष भरत कोल्हे, उपाध्यक्ष हेमंत भंगाळे, सचिव प्रतीक वारके, खजिनदार रितेश चौधरी व सदस्य, तसेच सोशल मिडिया प्रमुख जितेंद्र भारंबे, नीरज झोपे, कृणाल कोल्हे, डोलेश चौधरी, हिमांशू राणे, चिन्मय वाघूळदे, हरिभाऊ सराफ, जयेश कोल्हे, आकाश फेगडे, पवन भारंबे यांच्यासह अनेक समाज बांधवांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. उद्या (दि.३१) दुपारी ४.०० वाजता वल्लभभाई पटेलांच्या चित्राची भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून यावेळी समाज बांधव व हितचिंतकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन जयंती उत्सव समिती अध्यक्ष व सदस्य युवा प्रतिष्ठान फैजपूर यांनी केले आहे.

Protected Content