धरणगाव प्रतिनिधी । अतिवृष्टीमुळे तालुक्यातील शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून त्वरीत भरपाई देण्याची मागणी चंदन पाटील यांनी केली आहे.
संततधार पावसामुळे शेतकर्यांचे ज्वारी मका बाजरी सोयाबीन व कापूस यांचे पूर्णपणे नुकसान झाले असून शेतकर्यांच्या तोंडात आलेला घास हा निसर्गाने हिराऊन घेतला आहे. ज्वारी, मका, सोयाबीन पूर्णपणे खराब झालेले असून शेतकर्यांना प्रशासनाने निवडणुकीच्या गडबडी तून बाहेर येऊन त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई शेतकर्यांना देऊन त्यांना जीवनदान देण्याची तात्काळ गरज आहे. याची दखल घेण्याची मागणी चंदन पाटील यांनी केली आहे.