चाळीसगाव प्रतिनिधी । गेल्या तीन वर्षांनंतर भरलेल्या मन्याड धरणाचे आज सकाळी 10 वाजता नवनिर्वाचित आमदार मंगेश चव्हाण यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले आहे.
चाळीसगाव तालुक्यातील २२ हुन अधिक गावांना संजीवनी ठरणारे व अनेक पाणीपुरवठा योजना कार्यान्वित असणारे मन्याड धरण जवळपास ३ वर्षांचा भीषण दुष्काळानंतर पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहे. यावेळी मनोगत व्यक्त करताना आ. मंगेश चव्हाण म्हणाले की, मी एका अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा आहे, त्यामुळे शेतीसाठी पाण्याचे किती महत्त्व आहे याची जाणीव मला आहे. आपल्या आशिर्वादाने मी आमदार झालो असून राज्यात महायुतीचे सरकार आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ना. गिरीश महाजन यांच्या माध्यमातून राज्याच्या जलआराखड्यात मन्याड धरणासाठी १ टीएमसी पाण्याची तरतूद करण्यात आली आहे. मन्याड धरण कृती समिती व सर्व नेतेमंडळी यांना सोबत घेऊन धरणाची उंची वाढविणे, वॉटर ग्रीडच्या माध्यमातून गिरणा-मन्याड धरण लिंक व अजून ज्या काही उपाययोजना असतील त्याबाबत ठोस पाठपुरावा करून तालुका सिंचनाचा चाळीसगाव पॅटर्न निर्माण करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
मार्केट सभापती रविंद्र पाटील, उपसभापती महेंद्र पाटील, भाजपा माजी तालुकाध्यक्ष सुरेश सोनवणे, नांद्रे काकळणे गृप ग्रामपंचायत सरपंच अनुराधा पाटील, मार्केट संचालक धर्मा काळे, भाजपा शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, शिवसेना नगरसेवक नाना कुमावत, नगरसेविका विजया पवार, भास्कर पाटील, सायगावचे सरपंच नथु पैलवान, उपसरपंच शंकर महाजन, माजी पं.स. सदस्य संभाजीराजे पाटील, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष अमोल चव्हाण, तालुकाध्यक्ष रोहन सूर्यवंशी, भाजपा तालुका उपाध्यक्ष कपिल पाटील, मनोज साबळे, शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख भीमराव खलाणे, विकासो चेअरमन साहेबराव पाटील, गिरणा पाटबंधारे उपविभागीय अभियंता हेमंत पाटील, नांद्रे येथील भावडू,
पिंप्री प्र.दे उपसरपंच शरद पाटील, अशोक पाटील, रोहिदास पाटील, अलवाडी येथील गोरख अप्पा, ज्ञानेश्वर पाटील, समाधान पाटील, संजय पाटील, शिरसगाव सरपंच दिगंबर पाटील, वसंत चव्हाण, दिलीप पाटील, अभिराज चव्हाण, आबा बछे, शिवाजी सोनवणे, रविंद्र पाटील, राम पाटील, आडगाव सरपंच रावसाहेब पाटील, हिरे, प्रवीण पवार यांच्यासह मन्याड धरण कृती समितीचे पदाधिकारी, परिसरातील गावांचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विकासो चेअरमन व संचालक, विविध पक्ष – संघटनांचे पदाधिकारी – कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.