Home Cities चोपडा चोपड्यातून शिवसेनेच्या लताताई सोनवणे विजयी घोषित

चोपड्यातून शिवसेनेच्या लताताई सोनवणे विजयी घोषित

0
102


Latabai Sonawne

चोपडा, प्रतिनिधी | जिल्ह्यातील चोपडा मतदार संघातून विद्यमान आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या पत्नी व महायुतीच्या अधिकृत उमेदवार सौ.लताताई सोनवणे या विजयी घोषित झाल्या आहेत.

 

त्यांना ७७४२४ मते पडली तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार महा आघाडीचे जगदीश वळवी यांना ५७००२ मते पडली. म्हणजेच २०४२२ मतांनी त्या विजयी झाल्या आहेत. या मतदार संघातील मतदारही बंडखोर उमेदवारांच्या पाठीशी उभे राहिलेले दिसत नाहीत. त्यांनी अधिकृत उमेद्वारांच्याच पारड्यात आपला कौल दिला आहे. त्यामुळे बंडखोर अपक्ष उमेदवार प्रभाकर सोनवणे हे तिसऱ्या क्रमांकावर राहिले आहेत.


Protected Content

Play sound