Home क्राईम स्टेपनी चोरास भुसावळातून अटक

स्टेपनी चोरास भुसावळातून अटक


रावेर (प्रतिनिधी) शहरातील सावदा रोडवर उभ्या असलेल्या अॅपेरिक्षातील स्टेपनी ( चाक ) चोरुन नेल्याप्रकरणी भुसावळ येथील एकास रावेर पोलिसांनी अटक केली आहे.


या बाबत वृत्त असे की, रावेर येथील इमामवाड्यातील इस्माईलखान खान याने जिलेबी सेंटर जवळ आपली अॅपेरिक्षा उभी केली होती, कोणीतरी अज्ञात चोरट्याने अॅपेरिक्षामधील सुमारे १००० रु . किमतीची स्टेपनी ( चाक ) ड्रायव्हरशिट खालुन चोरुन नेली. या बाबत रावेर पो.स्टे. ला भादवी ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस पथकाने भुसावळ येथून प्रविण मकासरे याला या प्रकरणी अटक करून त्याच्याकडुन चोरीस गेलेली स्टेपनी चाक डिस्कसह जप्त केली आहे. पुढील तपास पो. नि. ओमप्रकाश सोनी, पो. कॉ. / जाकीर पिंजारी व भरत सोपे हे करीत आहेत .


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound