चोपडा, प्रतिनिधी | भाजपचे जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती व चोपडा विधानसभा मतदारसंघातून उभे असलेले अपक्ष उमेदवार प्रभाकर सोनवणे यांनी विधानसभा क्षेत्र पिंजून काढला आहे. विधानसभेच्या प्रचारात सोनवणे यांनी ग्रामीण भागात आघाडी घेतली आहे. यामुळे अनेक उमेदवारांना धडकी भरली आहे.
ग्रामीण भागात स्वयंस्फूर्तीने प्रभाकर सोनवणे यांच्याशी हातमिळवणी करत आम्ही तुमच्या सोबत आहोत. सक्षम, शांत व विकासाचे व्हिजन असणाऱ्यासोबत आम्ही आहोत, असे म्हणत ग्रामीण भागात मतदारांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. चोपडा शहर व परिसारत आज प्रचार करतना रॅली च्या माध्यमातून शक्ती प्रदर्शन करण्यात येत आहे. रॅलीत नवयुवक व महिलांची विलक्षण स्वयंस्फूर्तीने गर्दी दिसत आहे. त्यांनी आदिवासी पाड्यापर्यत प्रचारात आघाडी घेतली आहे. त्यांनी प्रचाराच्या अंतिम टप्प्यात आघाडी घेतली असल्याचे चित्र दिसून येत आहे. सोनवणे हे प्रत्यक्ष नागरिकांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. त्यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे.