पोखरी व तांडा येथे चंद्रशेखर अत्तरदे यांचा झंझावाती प्रचार दौरा


3fbb9c3f 148a 4c96 9632 14460f4db683
 

जळगाव (प्रतिनिधी) पोखरी व तांडा येथे आज अपक्ष उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे यांचा झंझावाती प्रचार दौरा आज सकाळी मोठ्या उत्सातहात पार पडला.

 

यावेळी गावातील महिलांनी जागोजागी चंद्रशेखर अत्तरदे व जि.प. सदस्या माधुरीताई अत्तरदे यांचे औक्षण करून फुलहार घालून स्वागत केले. यावेळी गावातील नागरिकांनी त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी गावातिल सरपंच, ग्रा.पं. सदस्य, प्रमुख पदाधिकारी, गटातील शक्ति प्रमुख राजू बडगुजर, बूथ प्रमुख ताराचंद चव्हाण, राजू बडगुजर तसेच गटातील इतर बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, पन्ना प्रमुख तसेच पदाधिकारी यांच्यासह असंख्य भाजपा कार्यकर्ते व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.