विदगाव, प्रतिनिधी | जळगाव ग्रामीण मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे यांचा विदगाव येथे प्रचार दौरा आज १६ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.०० वा. मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी गावातील महिलांनी जागोजागी चंद्रशेखर अत्तरदे व जि.प. सदस्या माधुरीताई अत्तरदे यांचे औक्षण करून फुलहार घालून स्वागत केले.
अपक्ष उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे यांनी आज विदगाव येथे प्रचार दौरा केला. यावेळी गावातील नागरिकांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. याप्रसंगी माजी कृ.उ.बा.स. सभापति लकी आण्णा उर्फ लक्ष्मण गंगाराम पाटील, गावातील सरपंच, ग्रा.पं. सदस्य, प्रमुख पदाधिकारी, ममुराबाद-आसोदा गटातील शक्ति प्रमुख समाधान कोळी, किरण पाटील, बूथ प्रमुख बापू कोळी उपस्थित होते. तसेच मोरेश्वर सरोदे, विजय सपकाळे, मनेश सपकाळे, राजेंद्र पाटील, किरण पाटील, गोपाल मोरे, सुधीर पाटील, रविंद्र पाटील उपस्थित होते. यांच्यासोबत गटातील बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, पन्ना प्रमुख तसेच पदाधिकारी यांच्यासह असंख्य भाजपा कार्यकर्ते व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.