Home Cities चाळीसगाव अ.भा तंत्रशिक्षण संस्थेच्या सदस्यपदी किरण देशमुख यांची निवड

अ.भा तंत्रशिक्षण संस्थेच्या सदस्यपदी किरण देशमुख यांची निवड

0
33

kiran deshamukh

 

चाळीसगाव प्रतिनिधी । शहरातील प्रथितयश अभियंता किरण फकिरराव देशमुख यांची नवी दिल्ली येथील अखिल भारतीय तंत्रशिक्षण संस्थेच्या (आय.एस.टी.ई.) राष्ट्रीय कार्यकारी परिषद सदस्यपदी फेरनिवड करण्यात आली.

किरण देशमुख यांच्या पदाचा कार्यकाळ २०१९ ते २०२४ असा असणार आहे. देशातील तंत्रशिक्षण क्षेत्रामधील सर्वात मोठ्या संस्थेचे सव्वा लाख प्राध्यापक, पाच लाख विद्यार्थी व दोन हजार सातशे संस्था आय.एस.टी.ईच्या सदस्य आहेत. संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली किरण देशमुख यांची निवड करण्यात आली आहे. सलग दोन वेळा निवड झालेले किरण देशमुख हे खान्देशातून पहिले सदस्य ठरले असून त्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.


Protected Content

Play sound