चाळीसगाव, प्रतिनिधी | पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा अंत्योदय विचार मनात घेऊन भाजप शासन हे सर्व सामान्य रयतेच्या विकासासाठी काम करते आहे. हाच विचार घेवून मी शासकीय योजना तळागाळातील शेवटच्या ओळीतील शेवटच्या घटकापर्यंत पर्यंत पोहोचवणार आहे, असे मनोगत येथील महायुतीचे उमेदवार मंगेश चव्हाण यांनी आज (दि.१३) बिलाखेड व बेलगंगानगर येथून प्रचार दौरा सुरू करताना व्यक्त केले. यावेळी त्यांनी तालुक्याचे भाग्यविधाते स्व.रामराव जिभाऊ यांच्या बेलगंगा कारखाना येथील पूर्णाकृती स्मारकास माल्यार्पण केले.
भारतीय जनता पार्टी व महायुतीचे उमेदवार मंगेश चव्हाण यांचा मतदार संघात दररोज प्रचार दौरा सुरू असून, प्रत्येक गावातून तरुणाईचा त्यांना प्रतिसाद मिळत आहे. अनेक गावात पंढरीच्या वारीला त्यांच्यासोबत गेलेल्या वारकऱ्यांनी त्यांचे यांचे औक्षण करून पुष्पहार,पुष्पगुच्छ देऊन ढोल-ताशांच्या गजरात त्यांचे स्वागत होत होते.रोहिणी येथे दुष्काळात मंगेश चव्हाण यांनी चारा छावणी सुरू करून मुक्या जनावरांना चारा उपलब्ध करून शेतकऱ्यांचा भार हलका केला होता. याच परिसरात आजचा दौरा असल्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांच्या दौऱ्यात उपस्थिती देऊन भरभरून आशिर्वाद दिलेत. बिलाखेड,बेलगंगा नगर, डोण दिगर, पिंप्री बु.प्र.दे., ब्राह्मनशेवगे, माळशेवगे, शेवरी, अंधारी, तमगव्हान, पिंपळगाव, पिंपळवाड, निकुंभ, हातगाव, रोहिणी, राजदेहरे सेटलमेंट, तुका तांडा, घोडेगाव, तळेगाव, कृष्णा नगर, करजगाव, हिरापूर या गावांचा त्यांनी आज दौरा केला.
यावेळी दिवसभरातील दौऱ्यात त्यांच्यासोबत माजी आमदार साहेबराव घोडे, भाजपा तालुकाध्यक्ष के.बी. साळुंखे, पं.स. सभापती दिनेश बोरसे, उपसभापती संजय भास्करराव पाटील, मार्केट सभापती रविंद्र पाटील, उपसभापती महेंद्र पाटील, बेलगंगा चेअरमन चित्रसेन पाटील, रिपाई जिल्हाध्यक्ष आनंद जी. खरात, भाजपा सरचिटणीस अनिल नागरे, धनंजय मांडोळे, उपाध्यक्ष कपिल पाटील, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष रोहन सूर्यवंशी, युवा मोर्चा तालुका सरचिटणीस मनोज साबळे, मार्केट संचालक किशोर पाटील, शिरीष जगताप, माजी पं.स. सदस्य पतींग पाटील, प्रताप पाटील, विलास पाटील, शरद पाटील, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष अमोल चव्हाण, रुपेश पाटील, सचिन पाटील, दत्ता नागरे, राम पाटील यांची उपस्थिती होती.