Home क्राईम धक्कादायक: जळगावात ईकरा महाविद्यालयात 28 विद्यार्थ्यांचे विवस्त्र करून रॅगिंग

धक्कादायक: जळगावात ईकरा महाविद्यालयात 28 विद्यार्थ्यांचे विवस्त्र करून रॅगिंग


Ekara enws

जळगाव प्रतिनिधी । युनानी महाविद्यालयाच्या मुलांच्या वसतीगृहात पहिल्याच दिवशी 28 विद्यार्थ्यांना डांबून विवस्त्र करत त्यांची रॅगिंग घेतल्याचा खळबळजनक प्रकार आज पहाटे २.०० वाजेच्या सुमारास उघडकीस आला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यासह केंद्र शासनाच्या दिल्ली येथील अॅन्टी रॅगिंग सेलकडे मेलद्वारे तक्रार करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, मुदस्सर मुख्तार इनामदार (वय 19, रा.परभणी) असे पिडीत विद्यार्थ्याचे नाव असून तो परभणी येथील राहणारा असून शुक्रवार (11 ऑक्टोबर) रोजी त्याच्या पालकांनी त्याला महाविद्यालयात सोडले होते. यानंतर शनिवारी त्यांच्या बॅचचा पहिलाच दिवस होता. दिवसभर महाविद्यालयातील लेक्चर्स आटोपल्यानंतर रात्री सर्व विद्यार्थी महाविद्यालयाच्या आवारात असलेल्या वसतिगृहात आपापल्या रूममध्ये गेले. यावेळी 15 ते 20 सिनीयर्स विद्यार्थ्यांनी पहाटे दोन वाजता नव्याने दाखल झालेल्या 28 विद्यार्थ्यांना वसतीगृहाच्या एका हॉलमध्ये नेऊन दरवाजा बंद केला.

त्यानंतर काही विद्यार्थ्यांना विवस्त्र करुन नंतर वेगवेगळ्या प्रकारे त्रास देण्यास सुरूवात केला. सिनेमातील पात्र, प्रियकर-प्रेयसी यांच्या प्रमाणे अॅक्टिंग करण्यास सांगुन नंतर एकेक विद्यार्थ्यांची ओळखपरेड सुरू केली होती. यावेळी मुदस्सर याला काही विद्यार्थ्यांनी शिवीगाळ देखील केली. त्याने विरोध करताच तीन-चार जणांनी त्याला खाली वाकवून मारहाण केली आणि त्याच्या खिशातील मोबाईल काढून कचरापेटीत फेकला. तसेच, खिशातील 18 हजार रुपये काढुन घेतले. त्यानंतर त्याला फुंकर मारुन ट्युब लाईट विझवण्याची टास्क देण्यात आली.


Protected Content

Play sound