फैजपूर येथे अनिल चौधरी यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन

anil chaudhari 2

फैजपूर, प्रतिनिधी | येथील सावदा रोडवरील ‘एकता ट्रान्सपोर्ट’ येथे अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले.

 

यावेळी फैजपूरचे माजी उपनगराध्यक्ष विद्यमान नगरसेवक कुर्बान, माजी नगरसेवक सभा पठाण, शहादूर तडवी, माजी उपनगराध्यक्ष बापू कापडे, विलास काठोके, शिवसेनेचे नगरसेवक अमोल निंबाळे, अन्वर खाटीक, ईश्वर इंगळे, बिस्मिल्ला शहा, निसार पठाण, कामिल पहिलवान, कामिल शेख, फारुक शेख, अब्दुल्ला भास्कर तेली, माझी पोलीस भास्कर तेली, बंटी मंडवाले, सुरेश तेली, राजु पाहुणे, माजी नगरसेवक भरत बाविस्कर, सलीम तडवी आदी यावेळी उपस्थित होते.

संतोष चौधरी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, येथील यावल-रावेर मतदारसंघात अनेक आमदार आले गेले, परंतु या वेळेस आपल्यासमोर नवीन चेहरा म्हणून तरुण तडफदार उमेदवार आपल्या म्हणण्याप्रमाणे मी देत आहे. धडाडीचे असे अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांनी आपल्या रावेर मतदारसंघात अनेक विकास कामे आमदार नसताना करून दाखवली आहेत आणि करीतही आहेत. तसेच आमदार झाल्यानंतर ते किती कामे करतील, याचा अंदाज आपल्याला लावता येणार नाही. यावल-रावेर मतदार संघात भव्य असे सार्वजनिक हॉस्पिटल मी आणि अनिलभाऊ आमच्या ट्रस्टमार्फत उभारणार आहोत. मित्रांनो हे आश्वासन म्हणून सांगत नाही तर आमच्यामध्ये काम करण्याची ताकद आहे, म्हणून हे शक्य आहे, असेही ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, मी जे काही यावल-रावेर मतदारसंघासाठी करीत आहे, ते केवळ मतदारांच्या पाठबळामुळे हे शक्य होत आहे. आज तुम्ही माझ्या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या वेळी एवढी गर्दी पाहून माझा विजय आजच झाला आहे, असे मी समजतो. असेच प्रेम पुढेही मतदानाच्या दिवसापर्यंत ठेवा आणि २१ तारखेपर्यंत मला अशीच साथ द्या, असे त्यांनी सांगताच टाळ्यांच्या गजरात नागरिकांनी त्यांचे कौतुक केले. यावेळी भुसावळसह यावल-रावेर तालुक्यातील मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content