क्राईम, भुसावळ

भुसावळात सामूहिक हत्याकांड; रवींद्र खरात यांच्यासह पाच जणांचा खून

शेअर करा !

802562 murder 16

भुसावळ प्रतिनिधी । गुन्हेगारीचा शिक्का बसलेल्या भुसावळात सामूहिक हत्याकांडाने खळबळ उडाली असून यात भाजपचे नगरसेवक रवींद्र खरात यांच्यासह पाच जणांचा खून करण्यात आल्याची घटना रात्री घडली आहे.

  • spot sanction insta
  • advt tsh flats

याबाबत वृत्त असे की, आज रात्री पावणेदहाच्या सुमारास रवींद्र बाबूराव खरात यांच्या कुटुंबावर हल्ला चढविण्यात आला. यात स्वत: रवींद्र बाबूराव खरात, त्यांचे बंधू सुनील बाबूराव खरात, मुलगा प्रेमसागर, मुलगा रोहित आणि सुमीत गजरे हे ठार झाले आहेत. तर ऋत्वीक या मुलासह पत्नी आणि दोन जण गंभीर जखमी झालेले आहेत. दरम्यान, प्रत्यक्षदर्शींनी पोलीसांना दिलेल्या माहितीनुसार हल्लेखोरांनी पहिल्यांदा सुनील बाबूराव खरात यांच्यावर गोळीबार करून गुप्तीने वार केले. हा आवाज ऐकून रवींद्र खरात आणि त्यांचे कुटुंबिय घराबाहेर आले असतांना हल्लेखोरांनी त्यांच्याकडे मोर्चा वळविला. यात रवींद्र खरात यांच्यावर घराजवळ गोळीबार करण्यात आला. तर त्यांची मुले जीव वाचवण्यासाठी पळाली असतांना आरोपींनी त्यांचा पाठलाग करत रेल्वे हॉस्पीटलजवळ त्यांना गाठले.

दरम्यान, सर्व मृतदेह जिल्हा रूग्णालयात आणण्यात आले असून येथे प्रचंड तणावाचे वातावरण आहे. कोणताही अनुचीत प्रकार होऊ नये म्हणून कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे.