भुसावळ प्रतिनिधी । येथील श्रीमती प.क.कोटेचा महिला महाविदयालयात वस्तू व सेवा कर (GST) याविषयावर एक दिवसीय विद्यापीठ स्तरीय कार्यशाळेचे आयोजन आज करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने अतिथींच्या हस्ते करण्यात आली. सुरुवातीला कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यशाळेच्या प्रमुख वाणिज्य विभाग प्रमुख डॉ.राजकुवर गजरे यांनी केले. याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना सहज सोप्या शब्दात GST म्हणजे Simple Tax अशी व्याख्या सांगितली व सरकारचे GST हे बाळ अजून अडीच वर्षात रांगायला लागले असून लवकरच ते पळू लागेल व त्यावेळी विदयार्थ्यांसाठी GST च्या माध्यमातून कशाप्रकारे संधी उपलब्ध होतील. कारण संगणकाच्या माध्यमातून 3६ प्रकारचे Returns GST file करताना भरावे लागतात. व्यापारीवर्गाजवळ असणाऱ्या वेळेच्या कमतरतेचा उपयोग विद्यार्थ्यांनी रोजगार मिळविण्यासाठी करावा असे त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना सांगितले. तसेच बिजभाषक सीए मगन पाटील यांनी मार्गदर्शन करताना GST हे सरकारचे अडीच वर्षाच्या मात्र वात्रट बाळ’ म्हणून करून Returns file करताना येणाऱ्या अडचणींचा उल्लेख केला व या अडचणी सुलभ कशा होतील याकडे लक्ष वेधले. त्यानंतर सीए मुकेश अग्रवाल यांनी GSTमध्ये करियर करण्यासाठी फक्त तीन गोष्टीची आवश्यकता असल्याचे सांगितले, ज्या म्हणजे वाणिज्य शाखेचे विद्यार्थी, संगणक कौशल्य व जीएसटी कोर्स केलेला असला पाहिजे. त्याबरोबरच त्यांच्या संपर्कातील काही बी-कॉम झालेल्या विद्यार्थ्याची उदाहरणे त्यांनी दिली. जे मासिक ५० ते ८० हजार फक्त GST Retums file करून कमावत आहेत.
अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाच्या प्राचार्या मेजर डॉ. साबद्रा यांनी उपस्थित पाहुणे संचालक, सीए, व्यापारी व प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांचे स्वागत करत महाविद्यालयातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध eco-friendly उपक्रमांची माहिती व संपूर्ण भारतातील विद्यापीठांमध्ये सर्वात अगोदर जीएसटी कोर्स सुरु करण्यामागचा उद्देश यावेळी सांगितला. जीएसटी कोर्सच्या माध्यमातून कुशल रोजगारक्षम विद्यार्थी घडविण्यासाठी जीएसटी कोर्स घेणाऱ्या महाविद्यालयांना अनुदान देण्याची मागणी मा.कमिशनर अधिकारी यांच्याकडे करण्यात आली. सीए मुकेश अग्रवाल यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्वल भविष्यासाठी जीएसटी कोर्स करण्याचे आवाहन केले. तसेच यावेळी उपस्थितांनी मान्यवरांनी सुध्दा आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यशाळेला उद्घाटक म्हणून महाराष्ट्र शासनाचे जळगाव येथील Joint Commissioner अनंत राख व प्रमुख पाहुणे म्हणून कार्यशाळेचे बिजभाषक जळगाव जिल्हा टक्स प्रक्टीशनर संघाचे अध्यक्ष सीए मगन पाटील, महाविद्यालयाच्या जीएसटी संदर्भात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे मार्गदर्शक सीए मुकेश अग्रवाल, कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्या मेजर डॉ. मंगला साबद्रा आणि कार्यशाळेच्या प्रमुख वाणिज्य विभागाचे प्रमुख डॉ.राजकुवर गजरे, उपप्राचार्या डॉ.शिल्पा पाटील, उपप्राचार्य डॉ.धनविज सर, महाविद्यालयातील प्राध्यापक, परिसरातील सीए व कार्यक्रमासाठी विशेष उपस्थित जळगाव जिल्हा व्यापारी संघाचे अध्यक्ष राधेश्याम लाहोटी व संस्थेचे संचालक प्रशांत उपस्थित होते. समारोप कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे आभार प्रदर्शन महाविद्यालयातील जीएसटी कोर्सचे समन्वयक प्रा. सुरज हेडा यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अक्षरा साबळे व प्रा.दिक्षिता साळुके यांनी केले व याप्रसंगी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील इतर प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.