धरणगाव प्रतिनिधी । जळगाव ग्रामीण मतदार संघासाठी शुक्रवारी शेवटच्या दिवसापर्यंत एकूण 16 उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यापैकी 15 उमेदवारी अर्ज वैध तर एक अर्ज अवैध ठरविण्यात आला आहे.
जळगाव ग्रामीण मतदार संघासाठी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. 4 रोजीच्या अखेरच्या दिवसापर्यंत एकूण १६ उमेदवारांचे २६ अर्ज दाखल केले होते. त्यामध्ये सात जणांनी नोंदणीकृत राजकीय पक्षातर्फे तर नऊ जणांनी अपक्ष उमेदवारी दाखल केले. आज उमेदवारी अर्ज छाननी करण्यात आली. त्यात ज्ञानेश्वर महाजन यांनी राराष्ट्रवादी पार्टीकडून भरलेल्या फार्मला एबी फार्म लावलेला नसल्याने अर्ज बाद ठरविण्यात आला.
यांचे अर्ज ठरले वैध
राज्य मंत्री गुलाबराव पाटील (शिवसेना), पुष्पा महाजन व ज्ञानेश्वर महाजन (रा.काँ.), मुकुंद रोटे (मनसे), संजय बाविस्कर (बसपा), दिलीप पाटील (शेकाप), उत्तम सपकाळे (वंचित आघाडी) तर विशाल देवकर, लक्ष्मण पाटील, चंद्रशेखर अत्तरदे, जितेंद्र देशमुख, माधुरी अत्तरदे, ईश्वर सोनवणे, प्रदीप मोतीराया, संभाजी कोळी व तुळशीराम पाटील यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. सोमवारी ७ ऑक्टोबर रोजी माघारीची मुदत आहे. त्या नंतरच लढतीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे.