जळगाव, प्रतिनिधी | भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आर.पी. आय (आ.) रासप, शिवसंग्राम, रयत क्रांती, महायुतीचे अधिकृत उमेदवार व जळगाव शहराचे आ. सुरेश दामू भोळे यांनी जळगाव शहराच्या विधानसभेच्या उमेदवारीसाठी आज गुरुवार दि. ३ ऑक्टोंबर उमेदवारी अर्ज दाखल केला.
आज दुपारी १२.३० वाजता ना.गिरीशभाऊ महाजन यांच्या उपस्थितीत महायुतीचे उमेदवार सुरेश भोळे यांच्या भव्य अशा महारॅलीला ढोल ताश्याच्या गजरात व फटाके फोडून सुरवात झाली. या रॅलीचा पुढे कोर्ट चौक, नेहरू चौक मार्गे जाऊन ठिकठिकाणी ना. गिरीश महाजन व आ. सुरेश भोळे यांचे व्यापारी वर्ग तसेच गणेश मंडळ, सर्व सामान्य जनतेकडून स्वागत करण्यात येत होते. या रॅलीमध्ये ना. गुरुमुख जगवानी, आ. चंदूभाई पटेल, शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख उदयजी सावंत, महापौर सीमा भोळे, उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे, शिवसेना जिल्हा महानगर प्रमुख शरद तायडे, माजी महापौर नितीन लढ्ढा , मनपा सभागृह नेते ललित कोल्हे, आरपीआय (आ.) चे जिल्हा अध्यक्ष आनंद बाविसकर, विभाग अध्यक्ष दीपक सपकाळे, महानगर अध्यक्ष अनिल अडकमोल, तसेच रासप, शिवसंग्राम, रयत क्रांतीचे पदाधिकारी व जि. प. सभापती पोपट भोळे, मनपा स्थायी सभापती जितेंद्र मराठे, महिला व बालकल्याण समिती सभापती मंगला चौधरी, शिवसेना मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन, नितीन बरडे, मानसिंग सोनवणे व शोभा चौधरी तसेच आरपीआयचे अशोक तायडे, नंदा बाविस्कर, भाजपा संघटन सरचिटणीस विशाल त्रिपाठी, दीपक सूर्यवंशी, राजेंद्र घुगे पाटील, महेश जोशी, दीपक साखरे, सचिन पानपाटील सर्व भाजपा जिल्हा पदाधिकारी, मंडल अध्यक्ष, विविध आघाड्यांचे अधक्ष्य व भाजपा शिवसेनेचे सर्व नगरसेवक महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते या महा रॅलीमध्ये हजारोच्या संख्यने उपस्थित होते.