
भुसावळ प्रतिनिधी । आयशर ट्रकमधून अवैध पध्दतीत गुरे वाहून नेणार्यांना पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, पोलिसांना एका आयशर ट्रकमधून गुरांची अवैध वाहतूक करण्यात येत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. यानुसार हा आयशर ट्रक शहरानजीक असणार्या बियाणी मिल्ट्री स्कूलजवळ अडविण्यात आला. यात १३ म्हशी व एक रेडा आढळून आला. या गाडीचा चालक फिरोज मोहंमद मेहबूब (वय २४ रा. महू मध्यप्रदेश) तसेच राजू शेख रूस्तम शेख (वय ४५, रा. नागदा, जिल्हा देवास, मध्यप्रदेश) आणि सुफीयान मोहंमद नवाज (वय ३०) या तिघांना विचारणा केली असता ते समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही. त्यांच्याकडे अधिकृत पावत्यादेखील नव्हत्या. यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरूध्द महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा १९७६च्या कलम ०६,०९ आणि ११ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला आयशर ट्रकदेखील जप्त केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास एएसआय तसलीम पठाण यांच्यासह हवालदार जयराम खोडपे, सुनील जोशी, गजानन वाघ, बापूराव बडगुजर आदी करत आहेत.


