चोपड्यातून वंचित आघाडीतर्फे अरुणा बाविस्कर यांना उमेदवारी

aruna baviskar

 

चोपडा प्रतिनिधी । काँग्रेस आयचे माजी तालुका अध्यक्ष संजीव बाविस्कर यांचा पत्नी अरुणा बाविस्कर यांना बहुजन वंचित आघाडी तर्फे विधानसभा निवडणूकीसाठी उमेदवारी मिळाली असून येत्या 3 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती संजीव बाविस्कर यांनी नुकतीच दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अरुणा बाविस्कर यांनी कॉंग्रेस आयचे उपजिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष महिला आघाडी चोपडा, शेतकरी महिला किसान सेलच्या जिल्हाध्यक्ष, माजी सचिव इनरव्हिल क्लब, कात्यायनी बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष असे विविध सामाजिक पदावर काम केले आहे. त्यांना राजकीय कामाचा अनुभव आहे.

 

Protected Content