Home Cities भुसावळ भुसावळात काँग्रेस पदाधिकार्‍यांची निदर्शने

भुसावळात काँग्रेस पदाधिकार्‍यांची निदर्शने

0
30


भुसावळ प्रतिनिधी । राष्ट्रपिता महात्मा गांधी याची विटंबना करणार्‍यांविरूध्द कठोर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी या मागणीसाठी येथे काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शने करून तहसीलदारांना निवेदन दिले.

हिंदू महासभेच्या पुष्पा शकून पांडे यांनी व त्यांच्या सहकार्‍यांनी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेसमोर गोळ्या झाडून विटबंना केल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे महात्मा गांधी यांच्या प्रतिमेची विटंबना झाली. या प्रकरणी संबंधितांविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुन हिंदू महासभेवर बंदी आणावी, या मागणीसाठी शहर काँग्रेस कमेटीने शुक्रवारी निदर्शने केली. काँग्रेसचे शहराध्यक्ष रविंद्र निकम, मोहन निकम, अनिता खरारे, शैलेश अहिरे, विजय तुरकुळे, रहिम मुसा कुरेशी, भगवान मेढे, अ‍ॅड. प्रमोद चव्हाण, जे. बी. कोटेचा, विलास खरात, संतोष साळवे, सलीम गवळी, महेंद्र मराठे आदी पदाधिकारी उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound