Home Cities जामनेर राष्ट्रवादीच्या जामनेर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

राष्ट्रवादीच्या जामनेर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

0
28


WhatsApp Image 2019 09 27 at 8.15.27 PM

जामनेर, प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ई.डी.ने शिखर बँक घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल केला त्याचा निषेध म्हणून. आज दि. २७ रोजी जामनेर येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे बंद पुकारण्यात आला होता.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नेते अभिषेक पाटील, तालूकाध्यक्ष राजेंद्र चौधरी,किशोर पाटील, यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांच्या समवेत सरकार विरोधात रस्त्यावर उतरून जामनेर बंद पुकारण्यात आले. यावेळी रस्त्यावर टायर जाळून आंदोलकांनी निदर्शने केली. सरकारविरोधात संताप व्यक्त केला. यावेळी काही काळ जामनेरकरानीं बंदला उस्फुर्त प्रतिसाद देत आपापले दुकाने व बाजारपेठ काही वेळ बंद ठेवली. बंदच्या वेळेत कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी जामनेर पोलीस प्रशासनाकडून शहरातील मुख्य रस्त्यावर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आंदोलना दरम्यान जावेद मुल्लाजी, शंभर राजपूत, जितेश पाटील, सागर पाटील, गणेश झाल्टे, रवी बंडे, प्रभू झाल्टे आदी व पार्टीचे कार्यकर्ते होते.


Protected Content

Play sound