पवार यांच्यावर गुन्ह्याच्या निषेधार्थ धरणगावात कडकडीत बंद

dharangaon band

धरणगाव, प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यावर होणाऱ्या कारवाईच्या निषेधार्थ आज (दि.२७) येथे रा.काँ.तर्फे कडकडीत बंद पाळण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी की, राज्यातील शिखर बँकेत पवार सभासद किंवा संचालकही नाहीत, असे असतांनाही या शिखर बँक घोटाळ्यात जाणीवपूर्वक व सूडबुद्धीने त्यांचे नाव गोवण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत आहे. सरकारच्या दावणीला बांधलेल्या ईडीमार्फत त्यांच्यावर चौकशीचा फास टाकण्यात येत आहे. हा सर्व प्रकार लोकशाहीतील छुप्या हुकूमशाहीचे प्रतीक आहे. सरकारी यंत्रणा स्वतंत्ररित्या काम न करता सरकारच्या दबावाखाली काम करतेय. या सर्व निंदनीय प्रकारचा निषेध म्हणून आज शहरात बंद पाळण्यात आला.

त्याआधी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेता पोलीस स्टेशनची पूर्वपरवानगी घेण्यात आली. काल सायंकाळी गावातील सर्व व्यापारी, लहान-मोठे व्यावसायिक यांना बंदच्या संदर्भात पूर्वसूचना देण्यात आली व सर्वांनीच सकारात्मक प्रतिसाद दिला. याचाच परिणाम म्हणून आज गावात सर्वांनी बंद यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सहकार्य केले. या घटनेचा निषेध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शहर व तालुक्याच्या वतीने तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले. तहसिल कार्यलय येथे माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, माजी उपनगराध्यक्ष दीपक वाघमारे, माजी सभापती एन.डी. पाटील, जळगाव ग्रामीणचे विधानसभा क्षेत्रप्रमुख रमेश माणिक पाटील, तालुकाध्यक्ष धनराज माळी आदींनी मनोगतातून आपल्या भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन लक्ष्मण पाटील यांनी केले.

याप्रसंगी माजी लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पाताई महाजन, माजी नगरसेवक निलेश चौधरी, हाजी इब्राहिम, अॅड. वसंतराव भोलाणे , माजी जि. प. सदस्य रविंद्र भिलाजी पाटील, माजी उपसभापती रंगराव पाटील, युवक तालुकाध्यक्ष नाटेश्वर पवार, युवक शहराध्यक्ष संभाजी कंखरे, जेष्ठ नेते मोहन पाटील, डी.एस. पाटील, नारायण चौधरी, सेलचे जिल्हाध्यक्ष अरविंद मानकरी, महिला जिल्हाध्यक्ष कल्पना अहिरे, डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. नितीन पाटील, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष अरविंद देवरे, तालुकाध्यक्ष अनिल पाटील, शहराध्यक्ष गुलाब महाजन, सिमा नेहते, वैशाली बोरोले, किशोर पाटील, गोपाल पाटील, सिताराम मराठे, अमोल हरपे, आनंद पाटील, मोहरा मराठे, सागर वाजपाई, अमोल सोनार, प्रमोद जगताप, राहुल पाटील, अजय महाजन, दिनेश भदाणे, सागर भामरे, सत्यवान कंखरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आजच्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल गावातील व्यापारी, लहान-मोठे व्यावसायिक, गावातील सर्व शैक्षणिक संस्था, पोलीस प्रशासन, तहसिल कार्यालय व गावातील नागरिक बंधू-भगिनींचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शहर व तालुक्याच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.

Protected Content