Home क्राईम मुंदाणे येथे कर्जाला कंटाळून तरुणाची आत्महत्त्या

मुंदाणे येथे कर्जाला कंटाळून तरुणाची आत्महत्त्या

0
41


mudane

 

पारोळा प्रतिनिधी । मुंदाणे येथील एका तरुणाने विषारी द्रव्य प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना आज (दि.23) घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, दिपक मधुकर पाटिल (वय-32) हा तरुण कर्जबाजारी झाला होता आणि सततची नापिकी, हात-उसनवारीच्या कर्जाला कंटाळून राहत्या घरात विषारी द्रव्य प्राशन केले. त्या तरुणाला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात तात्काळ दाखल करण्यात आले होते. मात्र प्रकृती अधिक खालावल्याने पुढील उपचारासाठी धुळे येथील रुग्णालयात घेवून जात असतांना त्यांच्या स्त्यातच मृत्यु झाला. मयताच्या पश्चात आई, वडिल, भाऊ, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. याबाबत पोलिस पाटील, अशोक पाटिल, सुनिल पाटिल यांनी पारोळा पोलीस स्टेशनला माहिती दिली. या घटनेचा पुढील तपास पो.कॉ. कैलास शिंदे करीत आहेत.


Protected Content

Play sound