रवींद्र महाजन यांना ‘उद्यान पंडित’ पुरस्कार जाहीर

d5d4f206 e288 4033 bddd b0dc5e986918

जामनेर, प्रतिनिधी | महाराष्ट्र शासनाच्या वतीने कृषी व फलोत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांना दिला जाणारा ‘उद्यान पंडित पुरस्कार-२०१७’चा पुरस्कार येथील प्रगतिशील शेतकरी तसेच मातोश्री नर्सरीचे संचालक, छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवींद्र माधवराव महाजन यांना जाहीर झाला आहे.

 

नुकतीच शासन निर्णयानुसार राज्यातील विविध कृषी पुरस्कारांची निवड जाहीर करण्यात आली असून राज्यभरात उद्यान पंडित पुरस्कारांसाठी लोकांची निवड करण्यात आली आहे. महाजन यांनी आपल्या शेतात केलेले विविध प्रयोग, जसे वनशेती, आंबा, मोसंबी या फळपिकांची घनपद्धतीने लागवड, आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतीत वापर, जलसंधारण,पाणलोट विकास, जलव्यवस्थापन, फळबागांना पाणी देण्यासाठीचे सुक्ष्म नियोजन, मातोश्री नर्सरीच्या माध्यमातून जिल्ह्यात तसेच राज्यभरात तयार झालेल्या फळबागा, फळबागेच्या माध्यमातून साधलेली प्रगती आणि ‘शेतकरी आत्महत्त्या कारणे आणि उपाय’ या विषयावर स्वतः नाट्य लेखन करून आत्महत्त्या रोखण्यासाठी केलेले प्रयत्न, सामाजिक क्षेत्रातील कार्य आदी कामाची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. पुरस्कार मिळालेल्यात रवींद्र महाजन हे उत्तर महाराष्ट्र विभागातून निवड झालेले एकमेव शेतकरी आहेत, त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

Protected Content