चोपडा, प्रतिनिधी | जैनांनी आपल्या जैन तत्वानुसार वागणूक करायला हवी, जैन धर्मात झोपेतून उठण्यापासून तर रात्रीपर्यंत अनेक छोटे-छोटे नियम घालून दिले आहेत आणि ते जरी पाळले तरी अनेक जीवांची हत्या आपण वाचवू शकतो. जैनांनी तत्वशीर वागल्यास त्याचा प्रभाव इतर समाजावर नक्कीच होईल असे प्रतिपादन संस्कार शिबिरात जैनत्व सुरक्षा संघाचे प्रमुख वक्ता अहमदाबाद निवासी सी.ए.श्रेयास छाजेड यांनी केले.
आज (दि.१५) रोजी सकाळी १२.०० वाजता बोथरा मंगल कार्यालयात भारतीय जैन संघटना, भारतीय महिला जैन संघटना व रोटरी क्लब, एक कदम महिला संघटना, सकल जैन महिला संघटना, चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या संस्कार प्रदर्शनीत ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, सकाळी उठण्यापासून तर झोपेपर्यंत जैन धर्मानुसार अनेक नियम पाळून आपण लहान लहान प्राण्यांची हत्त्या टाळू शकतो, जय जिनेद्र बोलणे, नमस्कार महामंत्राचा जाप करणे, जेवताना मांडी वाळूनच बसणे ताट धुवून पाणी पिणे, बाजारातुन भाजी आणतांना कसा विवेक ठेवावा, आंघोळीसाठी पाणी कमीतकमी वापरणे, हात धुताना, शौचालयात पाणी कमी वापरणे, प्रत्येक जैनांनी कंदमुळे खाऊच नये, रात्री जेवण करूच नये, व्यवहारात संयमी वागणे, पाणी गाळून प्यावे, शक्यतो गायींचा गोमूत्र, दूध, शेण, आणि शेणापासून बनवलेल्या गवऱ्याची राख पाण्यात टाकून ते पाणी प्यावे, असे अनेक उदाहरणे देत त्यांनी जैन तत्वांची महती सांगितली. यावेळी त्यांच्यासोबत हर्षल कांकरिया ( मालेगाव), निलेश चोरडिया (पारोळा) यांनीही मार्गदर्शन केले.
यावेळी समाजातील अनेक महिला पुरुष व बालगोपाल मोठ्या संख्येने हजर होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी भारतीय जैन संघटना, भारतीय महिला जैन संघटना व रोटरी क्लब, एक कदम महिला संघटना, सकल जैन महिला संघटना यांच्या सर्व पदाधिकाऱ्यानी परिश्रम घेतले.