जळगाव, प्रतिनिधी | महापालिका प्रशासकिय १७ मजली इमारतीत एकुण ६ लिफ्ट असून बऱ्याच वर्षापासून काही लिफ्ट कालबाह्य होवुन निकामी झालेले आहेत. या सर्वांच्या सर्व ६ लिफ्टच्या जागी नवीन लिफ्ट बसविण्याच्या कामाचा शुभारंभ महापौर सीमा भोळे यांच्या हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे, स्थायी समिती सभापती जितेंद्र मराठे, नगरसवेक राजेंद्र घुघे पाटील, कुलभूषण पाटील,मनोज आहूजा, चेतन सनकत, धिरज सोनवणे, विशाल त्रिपाठी, नगरसेविका ज्योती चव्हाण, उज्ज्वला बेंडाळे, पार्वताबाई भिल, आयुक्त.उदय टेकाळे यांचेसह मुख्यलेखाधिकारी श्री.वाहुळे, विद्युत विभाग प्रमुख सुशिल साळुंखे तसेच मनपा अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.