जळगाव, प्रतिनिधी | शहरात गणेशोत्सवानिमित्त अथर्वशिर्ष पठणाचे आयोजन करण्यात आले होते. हे आयोजन सुभाष चौक मित्र मंडळ, सुभाष चौक नागरी पतसंस्था जळगाव व श्री.स्वामी समर्थ केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. या उच्च कोटीच्या गणपती सेवेत हजारो गणेश भक्तांनी धारा प्रवाही गणपती अथर्वशिर्षाचे पठण केले.
सुभाष चौकात सालाबादप्रमाणे गणेशोत्सवानिमित्त अथर्वशिर्ष पठणाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ३ हजार अथर्वशिर्ष मुखोद्गत असलेल्या गणेशभक्तांनी एका स्वरात धारा प्रवाहीत लागोपाठ २१ आवर्तने म्हटली. तसेच ५० हजारपेक्षा अधिक सामूहिक आवर्तने झाली. यंदा मंडळाचे ४३ वे वर्ष असून अथर्वशिर्ष पठणाचे हे १४ वे वर्ष आहे. सुरवातीस कार्यक्रमाचे प्रमुख आर्चाय पंडित महेशकुमार त्रिपाठी आणि स्वामी समर्थ केंद्राचे प्रमुख भाऊसाहेब शिंपी यांनी गणपती अथर्वशिर्षाचे माहात्म्य कथन केले. हजारोच्या मुखातुन गणपती अथर्वशिर्ष पठणाचे स्वर वातावरणात मिश्रीत होऊन निर्माण होणाऱ्या उर्जेतून राष्ट्र समृद्धी, जळगाव शहरात व जिल्ह्यात शांतता रहावी, समृध्दी, सुबत्ता, एकोपा नांदावा राष्ट्रोन्नतीत कोणतेही विघ्न येवु नये, असा संकल्प गणेश भक्तांनी केला.कार्यक्रमाच्या सुरूवातीस शंखनाद, ओंकारध्वनी, गणपती पूजन, शांती पाठ व अथर्वशिर्षचे अर्थ व माहात्म्य कथन होऊन सामूहिक अथर्वशिर्षाची लागोपाठ २१ आर्वतने म्हटली गेली. यावेळी गणपतीवर दुग्धाभिषेक व दुर्वाभिषेक करण्यात आला. दुग्धाभिषेक सौ.खटोड व श्रीकांत खटोड तर, दुर्वाभिषेकसाठी उपस्थित भक्तांतुन ५ जोडप्यांची निवड करण्यात आली. याप्रसंगी अभिषेकातून पावन झालेले गणपतीचे ५१ चांदिचे शिक्के भाविकांना लकी ड्रॉ द्वारा क्रंमाक काढुन भेट देण्यात आले. या प्रसंगी सुभाष चौक मित्र मंडळाकडून गणपतीला ५६ भोग प्रसादाचा नैवद्य दाखवून आलेल्या भक्तांना वाटप करण्यात आला. सूत्रसंचालन संजय गांधी यांनी केले. यशस्वीतेकरीता श्रीकांत खटोड, मनीष अग्रवाल, विजय जगताप,भरतकुमार शहा, संजय पांडे, गोपाल पाटील, अलोक अग्रवाल, अक्षय खटोड, हरीष चव्हाण, प्रवीण बांगर, टोनू इशर्मा, मयूर कासार, अनंत कासार, नरेंद्र कापडणे, महेश दायमा, महेश गोला, सिध्दार्थ दाधिच, सचिन शर्मा,अनिल नारखेड, अमित कासार, पंकज गव्हाळे, पराग सरोदे, रवींद्र वारी, प्रमोद भामरे, महेश चौधरी, पंकज बिर्ला,मयुर जाधव, दत्तू विसपूते, मयुर जोशी, प्रशांत राहाणे, आकाश भक्कड व पतसंस्थेचे कर्मचारी व स्वामी समर्थ केंद्राचे निकम व अतुल कासार यांचे सहकार्य लाभले.