Home क्राईम सततच्या अपमानाला कंटाळून दलित अधिकाऱ्याची आत्महत्या

सततच्या अपमानाला कंटाळून दलित अधिकाऱ्याची आत्महत्या


32647912 this is a vector illustration of hanged man silhouette
 

लखीमपूर खेरी (वृत्तसंस्था) सततच्या अपमानाला कंटाळून उत्तर प्रदेशातील एका दलित अधिकाऱ्याने आत्महत्या केली. आत्महत्येला जबाबदार असल्याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

 

त्रिवेंद्र कुमार गौतम (वय २३) यांनी ग्रामविकास अधिकारी म्हणून सेवेला सुरुवात केली होती. गेल्या वर्षी त्यांना कुंभी गटामध्ये नियुक्त करण्यात आले होते. बुधवारी रात्री त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांचा मृतदेह लखीमपूरपासून १३० किलोमीटरवरील शिवसागर परिसरात सापडला. मृतदेहाजवळ वडिलांच्या नावे लिहिली चिठी सापडली. त्यात एका शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्ष, रसूलपूरचा सरपंच आणि अन्य एका सरपंचाचा मुलगा आपल्या आत्महत्येसाठी दोषी असल्याचे म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी या सर्वांनी मिळून गौतम यांचा एका बैठकीत अपमान केल्याचा व्हिडिओ या परिसरात व्हायरल झाला होता.


Protected Content

Play sound