Home Cities जळगाव योगेश भालेराव यांना महाराष्ट्र रत्न पुरस्कार जाहीर

योगेश भालेराव यांना महाराष्ट्र रत्न पुरस्कार जाहीर

0
106


purskar news

जळगाव प्रतिनिधी । केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य प.वि.पाटील विद्यालयाचे उपशिक्षक योगेश सुपडू भालेराव यांच्या उल्लेखनीय अशा शैक्षणिक कार्याची दखल घेऊन हजरत बिलाल बहुउद्देशीय सोसायटी जळगाव तर्फे त्यांना महाराष्ट्र रत्न आदर्श शिक्षक पुरस्कार नुकताच जाहीर करण्यात आला.

विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारचे शैक्षणिक उपक्रम घेऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी ते सदैव तत्पर असतात.त्याचप्रमाणे विविध प्रकारच्या सामाजिक उपक्रमात सुद्धा ते नेहमी सहभागी होतात म्हणून हजरत बिलाल संस्थेचे अध्यक्ष हजरत बिलाल तसेच सल्लागार खलील शेख (शिक्षण विस्तार अधिकारी जळगाव ) यांचे मार्फत त्यांना नुकतेच निवडपत्र प्राप्त झाले.


Protected Content

Play sound