डॉ. कलाम फाऊंडेशनतर्फे शिक्षकदिनानिमित्त शिक्षकांचा सत्कार

bodaval

 

बोदवड प्रतिनिधी । डॉ. कलाम फाउंडेशनच्या वतीने आज दि. 5 सप्टेंबर रोजी शिक्षकदिनानिमित्त तालुक्यातील जिल्हा परिषद उर्दू मुलांची व मुलींची शाळेमधील शिक्षकांच्या गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.

याबाबत माहिती अशी की, गेल्या काही महिन्यांपूर्वी आलेले शिक्षक रफिक शेख यांची कामकीर्दी व घडवून आणलेले परिवर्तन पाहता डॉ. कलाम फाउंडेशनच्या संचालक मंडळाने तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या कार्यरत शिक्षकांच्या सत्कार करत त्यांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच शिक्षकांनी उर्दू शाळांमध्ये शैक्षणिक क्षेत्रात घडवून आणलेल्या परिवर्तन पाहत त्या शिक्षकांचा गौरव करण्यात आला. गेल्या कित्येक वर्षांपासून बोदवड येथील जिल्हा परिषदेच्या दोघ उर्दू शाळा ह्या वाऱ्यावर गेल्याची परिस्थिती पहावयास मिळत होती. कित्येक वर्षांपासून हा भोंगळ कारभार चालू असल्याने विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनावर वाईट परिणाम होत होते. यामुळे पालक वर्गातून नाराजीची सूर उमटताना दिसते होते. परंतु जामनेर येथील रफिक शेख हे शिक्षक जिल्हा परिषद उर्दू मुलांची शाळा येथे रुजू झाले व त्यांनीं उर्दू शाळेत शक्य नसलेले परिवर्तन त्यांनी घडवून आणले. त्यांच्या या कारकीर्दीला पाहून पालक वर्गात दिलासा मिळाला आहे.

त्यावेळी समीर पिंजारी, फारूक शेख, ज़फ़र शेख, नईम खान, आदिल खान, साबीर शेख, नईम सय्यद, मुंतजीर अहेमद, युनूस शेख, लुकमान पिंजारी, जाफर मण्यार, जफर मण्यार फोटोग्राफर यांनी शिक्षकांना शुभेच्छा दिल्या असून आपली विशेष उपस्थितीत दिलीय.

Protected Content