पंजाबमधील फटाक्याच्या कारखान्यात स्फोट ; १८ जणांचा मृत्यू

Punjab Blast

 

गुरुदासपूर (वृत्तसंस्था) पंजाबमधील गुरुदासपूर येथे फटाक्याच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात १८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ५० जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात असून स्फोटानंतर लागलेली आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. दरम्यान, मृतांचा आकडा अजून वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

 

आज दुपारी चारच्या सुमारास हा स्फोट झाल्याची माहिती आहे. या स्फोटात जखमी झालेल्या व्यक्तींना हॉस्पिटलमध्ये नेण्यात येत आहेत. त्यांच्यावर त्या ठिकाणी प्राथमिक उपचार करण्यात येत आहेत. या स्फोटात ९ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. तसेच दोन इमारतीत ५० जण अडकल्याची माहिती आहे. दरम्यान, बटाला-जालंधर रोडवर हंसली परिसरात झालेल्या या स्फोटाचा आवाज अनेक किलोमीटरपर्यंत ऐकू आला. या स्फोटामुळे आसपासच्या अनेक इमारती ढासळल्या. घटनास्थळापासून 500 मीटर दूर असलेल्या मॉलच्या कांच फुटले. अग्निशामक दलाच्या 10 पेक्षा अधिक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

Protected Content