चोपडा (प्रतिनिधी) तालुक्यातील निमगव्हाण येथील तापी फाऊंडेशनतर्फे गावातील जिल्हा परिषद शाळेच्या आदिवासी व मागासवर्गीय प्रवर्गातील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना गणेशोत्सव व राजे प्रतिष्ठानचे जिल्हा संघटक दिव्यांक सावंत, अकुलखेडा येथील जिल्हा बँक शाखेचे मॅनेजर मंगेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक दायित्वातून प्रत्येकी वही, पेन, पट्टी आदी शैक्षणिक साहित्याचे नुकतेच मोफत वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा छाया बाविस्कर होत्या. तर प्रमूख पाहुणे म्हणून तापी फाऊंडेशनचे अध्यक्ष अनिल शिवाजी बाविस्कर, संचालक लिलाधर बाविस्कर, प्रदीप बाविस्कर, दिव्यांक सावंत, मंगेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. आदी मान्यवरांच्या हस्ते साहित्य वाटप करण्यात आले. याप्रसंगी प्राथमिक शिक्षक ज्ञानेश्वर बाविस्कर यांनी आपल्या मनोगतातून हृदयस्पर्शी मदती बद्दल तापी फाऊंडेशन परीवाराचे आभार मानले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व फलक लेखन राजेंद्र पारधी यांनी केले. कार्यक्रम यशस्विततेसाठी ज्ञानेश्वर बाविस्कर, राजेंद्र पारधी, उज्वला जोशी, दिलीप साळुंखे आदी शिक्षक वृंदांसह प्रकाश पाटील, चंद्रकांत बाविस्कर योगेश कोळी, विक्की ठाकरे यांनी परिश्रम घेतले. निमगव्हाण जि.प.शाळेच्या प्रांगणावर कार्यक्रम पार पडला.