एरंडोल प्रतिनिधी । माजी उपनगराध्यक्षा व नचिकेत इमेजींग सेंटरच्या संचालीका डॉ.गीतांजली नरेंद्र ठाकुर यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते प्रतिष्ठेच्या ‘आरोग्य साधना’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ग्राहक सृष्टी व रामकृष्ण पब्लिकेशनचे मनिष पात्रीकर यांच्या संकल्पनेतून व जी.एम.फाऊंडेशनच्या सहकार्याने या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
जिल्ह्यातील आरोग्य क्षेत्राबरोबरच इतर सामाजिक क्षेत्रांत ऊल्लेखनीय कार्य करणाऱ्या वैद्यकीय व्यवसायीकांचा पुरस्कारार्थीं मध्ये समावेश होता. एरंडोल परिक्षेत्रात करत असलेल्या वैद्यकीय सेवा ,सुखकर्ता फाऊंडेशन मार्फत करण्यात येत असलेले आरोग्य प्रबोधन,समोजोपयोगी उपक्रम व महिलाविषयक कार्य ह्याची दखल घेऊन महिला सक्षमीकरणाचे प्रतिक म्हणून डॉ..गीतांजली ठाकुर यांची पुरस्कारार्थी म्हणून निवड करण्यात आली. पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ..गीतांजली ठाकुर यांचे वैद्यकीय, सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक क्षेत्रातून अभिनंदन करण्यात येत आहे.
यांची होती उपस्थिती
पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री ना. गिरिश महाजन, भाजप जेष्ठ नेते एकनाथराव खडसे, जि.प.अध्यक्षा उज्वला पाटील, खासदार उन्मेश पाटील, आमदार गुरुमुख जगवानी, आमदार हरिभाऊ जावळे, आमदार राजुमामा भोळे, आमदार स्मिताताई वाघ, आमदार चंदूलाल पटेल, महापौर सिमा भोळे, माजी महापौर ललित कोल्हे, डॉ.संजीव पाटील यांच्या आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.