Home Cities जळगाव संत ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यालयात पोळ्यानिमित्त विविध कार्यक्रम

संत ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यालयात पोळ्यानिमित्त विविध कार्यक्रम

0
47

sant school

 

जळगाव प्रतिनिधी । येथील संत ज्ञानेश्वर प्राथमिक व उच्च प्राथमिक विद्यालयात आज दि. ३० ऑगस्ट रोजी पोळ्यानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले आहे.

याबाबत माहिती अशी की, संत ज्ञानेश्वर प्राथमिक व उच्च प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शेतकरी गीते, नृत्य विद्यालयाच्या परिसरात सादर केली. विद्यार्थ्यानी शेतकरी तर मुलींनी नववारी पातळ परिधान केले होते. बैलांची पूजा विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शितल कोळी यांनी केली. तसेच कार्यक्रमप्रसंगी सर्व विद्यार्थी, शिक्षकवृंद आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Protected Content

Play sound