Home Cities जळगाव मेघराज मेश्राम यांना सूर्योदय काव्य पुरस्कार जाहीर

मेघराज मेश्राम यांना सूर्योदय काव्य पुरस्कार जाहीर

0
48

WhatsApp Image 2019 08 27 at 2.40.44 PM

जळगाव, प्रतिनिधी | शहरातील सूर्योदय सर्वसमावेशक मंडळाच्या सतराव्या वर्धापन दिनानिमीत्त श्री दलुभाऊ जैन चॅरिटेबल ट्रस्ट प्रायोजित चौथ्या वर्षाचा सूर्योदय काव्य पुरस्कार नागपूर येथील कवी, समीक्षक मेघराज मेश्राम यांना जाहीर करण्यात आला आहे. रोख रक्कम,गौरवपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

यापूर्वी गो. शि. म्हसकर, प्रवीण लोहार, नामदेव कोळी यांना या पुरस्काराने गौरवण्यात आलेले आहे. मेघराज मेश्राम हे वयाच्या दहाव्या वर्षापासून वंचित, पीडित, शोषित, अपमानितांच्या व्यथा, वेदना, दु:ख, त्यातून उठणारा हुंकार यासाठी लेखन करीत आहे.प्रतिष्ठित नियतकालिके, दिवाळी अंक, वर्तमानपत्रांतून कथा, कविता, समीक्षा प्रसिद्ध असून काही कवितांचा हिंदी, इंग्रजी, उर्दू व बंजारा बोलीतून अनुवाद झालेले आहेत. तर तीन अप्रकाशित कवितासंग्रह असून  झाडीबोलीतील लोकगीतांचे संकलन केलेले आहे.


Protected Content

Play sound