इस्लामाबाद वृत्तसंस्था । भारत व पाकमध्ये तणाव वाढीस लागला असतांना आज पाकिस्तानने गझनवी या क्षेत्रपणास्त्राची चाचणी केली असून यात अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता आहे. यामुळे आता दोन्ही देशांमधील तणाव वाढीस लागण्याची भिती आहे.
जम्मू-काश्मिरमधील कलम-३७० रद्द केल्यामुळे पाकचे पित्त खवळले आहे. तेथील पंतप्रधान इम्रान खान आणि अन्य नेत्यांनी भारताला अनेकदा धमकी दिली आहे. या पार्श्वभूमिवर, आज गझनवी या क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली.पाकिस्तानातील कराचीजवळ सोनमियानी प्रक्षेपण चाचणी केंद्रावरून गझनवी क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आल्याचे आज जाहीर करण्यात आले आहे. पाकने भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्रातून जाण्यासाठी आधीच बंदी लादली आहे. या पार्श्वभूमिवर, आज गझनवीची चाचणी केल्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढू शकतो.