Home Cities जळगाव जळगावात महात्मा बसवेश्‍वर मार्गाचे नामकरण

जळगावात महात्मा बसवेश्‍वर मार्गाचे नामकरण

0
42

पहूर, ता. जामनेर वार्ताहर । जळगाव येथे आज सकाळी बसस्थानक ते सिव्हिल हॉस्पिटल पर्यंत रस्त्याचे महात्मा बसवेश्‍वर मार्ग असे नामकरण आमदार राजूमामा भोळे व उपमहापौर आश्‍विन सोनवणे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी महात्मा बसवेश्‍वर व वीरशैव लिंगायत समाजाबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी अरूणाप्पा कस्तुरे, ज्ञानेश्‍वर बारसे, सुभाष गुळवे , सुरेश तोडकरी , सुभाष तोडकर, रमेश घोडेस्वार, वैजनाथ स्वामी रेनापुरकर, प्रभुदेव तोडकर, वसंत खांदे, प्रा. रमेश आवटे सर आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाचा संपूर्ण खर्च महात्मा बसवेश्‍वर बहुउद्देशीयसंस्थेचे सरचिटणीस संदिप मिटकरी यांनी केला. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष संजय बसवे, गजानन आकाशे , समीर गुळवे , यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. रमेश आवटे सर यांनी मानले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound