जळगाव, प्रतिनिधी | आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या जळगाव जिल्हा महिला आघाडीतर्फे विविध मागण्यांंसाठी निदर्शने देण्यात आली.
आंदोलकांतर्फे रावेर तालुक्यात २८ लाखांच्या धान्य साठा जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी जप्त केला आहे. त्यात दोघा तिघांचा समावेश नसून मोठ्याप्रमाणावर इतरांचा सहभाग असल्याचा आरोप करण्यात आला. रावेर तालुक्यातील पुरवठा निरीक्षक हर्षल पाटील यांचा त्या भ्रष्टाचारात समावेश असल्याने हर्षल पाटील यांच्या मालमत्तेची चौकशी होऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी आंदोलकांनी केली. मागील दोन महिन्यापासून जळगाव शहर व तालुक्यात रेशन दुकानवर धान्य मिळालेले नाही ते देण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली तसेच मुद्रा लोन गोरगरिबांना देण्यात यावे अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष आनंद बाविस्कर यांनी केली.