पुणे (वृत्तसंस्था) प्रसिद्ध गायक आनंद शिंदे हे सुदैवाने आज अपघातातून थोडक्यात बचावले आहेत. त्यांच्या वाहनाला पुणे-सोलापूर महामार्गावर इंदापूरजवळ भीषण अपघात झालाय. दरम्यान, शिंदे यांचा वाहन चालक मात्र, या अपघातात गंभीर जखमी असल्याचे कळते.
आनंद शिंदे यांचा मुलगा उत्कर्ष हा निवडणूक लढविण्याची तयारी करतोय. त्याच निमित्ताने काल आनंद शिंदे आपल्या गावी निघाले होते. रात्री दोन वाजेच्या सुमारास इंदापूरजवळ वरकुटे येथे त्यांच्या गाडीला अपघात झाला. या अपघातातून आनंद शिंदे थोडक्यात बचावले आहेत, पण गाडीचे मात्र मोठे नुकसान झाले आहे.