भुसावळ प्रतिनिधी । भुसावळ शहर व तालुका वकील संघाच्या सहा जागांसाठी ८ फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे.
२५ जानेवारी रोजी माघारीची अंतीम तारीख होती. माघारीनंतर आता लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. यात ७ जागांसाठी २९ अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये अध्यक्षपदासाठी सुनील पगारे, तुषार पाटील, मतीन अहमद, नरेंद्रकुमार जैन व प्रकाश मोझे यांच्यात लढत होणार आहे. उपाध्यक्ष पदासाठी महेशचंद्र तिवारी, संतोष अढाईगे, संजय चौधरी, विजय निंभोरे, कृष्णकुमारी सिंग, धनराज मगर यांच्यात लढात आहे. तर सुशील बर्गे यांनी माघार घेतली. सहसचिव पदासाठी पुरुषोत्तम पाटील, नितीन सुरनासे, किशोरकुमार पाटील, अभिजित मेने, शामकांत चौधरी आणि महिला प्रतिनिधी पदासाठी जास्वंदी भंडारी, निधी महाजन रिंगणात आहेत. कोषाध्यक्ष पदासाठी राजेश कोळी, योगेश वाणी यांची उमेदवारी असून ग्रंथपाल पदाकरिता संजय तेलगोटे, मुकेश चौधरी व योगेश वाणी रिंगणात आहेत. दरम्यान,सचिव पदासाठी विजय तायडे, जगदीश भालेराव यांनी माघार घेतल्याने रम्मू पटेल बिनविरोध निवडून आले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून भूपेश बाविस्कर, विनोद तायडे, योगेश दलाल, धिरेंद्र पाल हे काम पाहत आहेत.