धरणगाव प्रतिनिधी । मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौर्यात निषेध करण्याची शक्यता लक्षात घेता राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांना आज सकाळी धरणगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
या संदर्भात अधिक असे की, सूडाच्या भावनेतून माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांना झालेली अटक, अजित पवार यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ईडीने केलेली चौकशी आदी मुद्द्यांवर राष्ट्रवादी सामाजिक कल्याण विभागाचे जिल्हाध्यक्ष अरविंद मानकरी व तालुकाध्यक्ष श्रावण बागुल हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौर्यात निषेध करण्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे कायदा सुव्यस्थेच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास अरविंद मानकरी व श्रावण बागुल या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेत धरणगाव पोलीस स्थानकात नेले आहे.