चोपडा, प्रतिनिधी | येथील प्रताप विद्यामंदिर शाळेतील सन ८५-८६ साली दहावीत असलेल्या ११० विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या ‘बचपन की यारी’ ग्रुपने कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना आर्थिक मदत देवून आपला खारीचा वाटा उचलला आहे.
राज्यभरातून पूरग्रस्तांना विविध प्रकारची मदत प्राप्त होत आहे. त्यामुळे समाजाचे आपणही काही देणे लागतो, या भावनेतून ग्रुपने त्यांच्या गेट-टुगेदर कार्यक्रमासाठी जमवलेली २५ हजार रुपयांची रक्कम कोल्हापूर येथील सदस्य प्रा.अशोक लिमये व डॉ.मीना भुतडा(तिवडे) यांच्या हस्ते पूरग्रस्त गरजु लोकांपर्यंत पाठवली आहे.