चोपडा येथे वाढीव घरपट्टीविरोधात शुक्रवारी मोर्चा- डॉ. चंद्रकांत बारेला

चोपडा प्रतिनिधी । नगरपालिकेने घरपट्टी वाढविण्याचा प्रस्ताव मंजूर करुन जनतेला कोणते गिप्ट दिले आहे ? कोणत्या सुविधा पुरविल्या आहेत ? याबाबत नगरपालिकेने उत्तर दयावे. पालिकेच्या नागरिकांना होत असलेल्या पिळवणूकी विरोधा शुक्रवार 23 ऑगस्ट रोजी धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात जनतेनेसह विविध संघटना, सामाजिक संस्था, यांनी आमच्या सोबत यावे, असे आवाहन डॉ. चंद्रकांत बारेला यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केली आहे.

 

शहरातील शासकीय विश्रामगृहात डॉ.चंद्रकांत बारेला यांनी मंगळवारी संध्याकाळी पाच वाजता पत्रकार परिषदेत डॅा.बारेला म्हणाले की, शहराला बारा दिवसांपेक्षा जास्त कालावधीने पाणी पुरवठा होत आहे. नागरी सुविधांचे तिन तेरा उडाले आहेत.त्यामुळे चोपडा नगर पालिकेने पंचवीस टक्के घरपट्टी वाढवून सामान्य जनतेला कोणते गिफ्ट दिले आहे?कोणत्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत?असा सवाल केला आहे. नागरिकांच्या प्रश्नांचा जाब विचारण्यासाठी २३ शुक्रवार रोजी सकाळी १० वाजता धडक मोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्च्यांत सामान्य जनता, सामाजिक संघटना, कॉलनी परिसरातील रहिवासी, मित्र परिवार, महिला, डॉक्टर असोसिएशन, आणि नागरिकांनी मोर्च्यांत सहभागी होऊन हा मोर्चा यशस्वी करावा असे, आवाहन डॉ चंद्रकांत बारेला यांनी केले आहे.

मोर्चा ग्रामीण पोलिस स्टेशनच्या मैदानापासून स्वस्तिक टॉकीज, चिंच चौक ,गुजराथी गल्ली, रथ गल्ली, मेन रोड मार्गे ते नगरपालिकेत येऊन मुख्याधिकाऱ्‍यांना निवेदन देण्यात येणार असून याबाबत जाब सुद्धा विचारले जाणार आहे. यावेळी पत्रकार परिषदेत अमोल राजपूत, ईश्वर सुर्यवंशी, सचिन पाटील,दीपक वानखेडे हे या पत्रकार परिषदेत उपस्थित होते.

Protected Content