जळगाव मनपावरील हुडकोचे कर्ज फेडण्याला राज्य सरकारची मान्यता (व्हिडीओ)

jalgaon manpa

जळगाव, प्रतिनिधी | येथील तत्कालीन नपाने हुडकोकडून घेतलेल्या कर्जाच्या परतफेडीसाठी २३३.९१ कोटींची एकत्रित रक्कम भरून कर्जमुक्त होण्याच्या प्रस्तावाला आज (दि.२०) राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.

या परत फेडीसाठीची रक्कम मनपास राज्याच्या नगर विकास विभागामार्फत उपलब्ध करून देण्यात येणार असून त्यातील ५० टक्के रक्कम जळगाव मनपाकडून दरमहा तीन कोटी याप्रमाणे वसूल करण्यात येणार आहे. मंत्रिमंडळाच्या या निर्णयाबद्दल आज सायंकाळी महापौर सिमा भोळे, उपमहापौर अश्विन सोनवणे, स्थायी सभापती जितेंद्र मराठे, भाजपा सभागृह नेते ललित कोल्हे, नगरसेवक कैलास सोनवणे, विशाल त्रिपाठी, सत्ताधारी गटातील सर्व नगरसेवक व कार्यकर्त्यांनी मनपासमोर फटाक्यांची आतषबाजी करून आनंद साजरा केला. दरम्यान, आ. सुरेश भोळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, महापालिका कर्जमुक्तीकडे वाटचाल करत आहे. सध्या महापालिका बऱ्याच प्रमाणात कर्जमुक्त झाली असून त्यासाठी मी पालकमंत्री गिरीश महाजन व माजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे आभार मानतो. हुडकोचे कर्ज शासन भरणार असून ५० टक्के रक्कम महापालिका दरमहा ३ कोटी रुपये राज्य शासनास देणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

 

Protected Content